loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning

Article/Chapter Title :

जुन्नर आणि संगमनेर वनविभागतील मानव-वन्यजीव संघर्ष

संवादगाथा

4

बिबट्या , वन , जंगल , मानव-वन्यजीव संघर्ष , वन्यप्राणी , पर्यावरण

Views: 374
Gatha Cognition Free Publication
Cross Referance

२१ व्या शतकात पर्यावरणासंदर्भातील प्रश्न स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या वाढत्या आव्हानांना सामोरे जाताना विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणं अत्यंत जिकिरीचं आणि महत्त्वाचं कार्य बनलेले आहे. या पार्श्वभूमीवर मानव व वन्य प्राण्यांमधील संघर्ष ही एक गंभीर समस्या अनेक भागांमध्ये बनलेली आहे. विशेषतः बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल आणि वानर यांसारख्या वन्यप्राण्यांशी मानवी संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. जुन्नर व संगमनेर वन विभागांमध्ये मानव व बिबट्यांमधील संघर्ष अधिक गंभीर बनलेला आहे. या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे वनक्षेत्रांवरील मानवी अतिक्रमण, ज्यामुळे या भागातील पर्यावरण परिसंस्था कमकुवत झालेली आहे. बिबट्यां सारख्या वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात घट झालेली आहे. परिणामी बिबट्या आणि इतर वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात ग्रामीण व निमशहरी लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष अपरिहार्यपणे पुढे आला. जुन्नर आणि संगमनेर या वनविभागातील वनांच्या शेजारील लोकवस्त्यांमधील मानसं आणि पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होताना दिसून येतात. एका बाजूला वन्य प्राण्यांच्या अन्न व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे मानवी वस्तीतील शेती, पशुपालन आणि एकंदर मानवसुरक्षा धोक्यात आली आहे. या संघर्षाचे मूळ कारण सामाजिक-आर्थिक विषमता, निसर्गाच्या मूलभूत तत्त्वांना दुर्लक्षित करणारे विकास मॉडेल, धोरणांमधील सुस्पष्टतेचा अभाव आणि त्या संबंधित योजनांची अपुरी व कमकुवत अंमलबजावणी यांमध्ये दडलेले आहे.

भूमी-उपयोजनातील बदलामुळे वन्यजीवांच्या अधिवासात होणारी घट यामुळे वन्यप्राण्यांचे मानवी वस्त्यांकडं स्थलांतर वाढत आहे.

बिबट्यामुळे पिकांचं, पशुधनाचं आणि माणसांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.

स्थानिक समुदायांचे शासनाकडून मिळणारी भरपाई आणि मदतीबाबत असमाधान असून पर्यावरणीय न्यायाचा अभाव जाणवतो.

संघर्षाच्या निराकरणासाठी विज्ञानाधारित उपाय, लोकसहभाग आणि सहजीवन धोरणांची गरज आहे.

Recommend for this Chapter