loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
पुरुष अनुभवातला आकलनातला
Purush Anubhavatla Akalanatla

0 Reviews | Write Review

127
200gms
Paperback
978-81-905857-2-9

130 / $2 130.00 / $ 2.00

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

 

पुरुषप्रधान व्यवस्थेत कौटुंचिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक - अशा सर्वच स्तरांवर स्वाभाविकपणेच पुरुषांचा प्रभाव सगळीकडे आढळतो. स्त्रीच्या अगदी विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या पद्धतीवरसुद्धा हा प्रभाव असतो. संख्येनं पुरुषांइतकीच असलेली स्त्री काही नगण्य अपवाद वगळता आजही जीवनाच्या साऱ्या क्षेत्रांत दुय्यम स्थानावर आहे. याही स्थितीत स्त्री व्यक्ती म्हणून आपले मत, विचार, निरीक्षण, आकलन स्वतंत्रपणे मांडू शकते - तिने ते केले पाहिजे. या तिच्या क्षमतेची चाहूल काही काही ठिकाणी जाणवते आहे.

आपण साऱ्याच जणी अगदी जन्मापासून या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या प्रभावाखाली असतो. पिता, पती, पुत्र, बंधू – अशा अनेक पद्धतीने 'पुरुष' जन्मापासून आपल्याशी निगडित असतो. या कौटुंबिक नात्यांखेरीज इतर अनेक नात्यांनी समाजात वावरताना आपल्याला 'पुरुषालासामोरं जावं लागतं. या साऱ्यांतून पुरुषांविषयी आपल्या मनात 'पुरुष' नावाची एक प्रतिमा तयार झालेली असते. स्वत:च्या अनुभवातून, सभोवताली घडणाऱ्या घटनांमधून पुरुषाविषयी आपल्या मनाशी काही चांगल्या-वाईट अशा गोष्टी जोडल्या जातात. त्यातूनही ही प्रतिमा अधिकाधिक स्पष्ट होत जाते.

आपल्या मनाशी तयार झालेली ही प्रतिमा कशी असते? काय असतो आपल्याला समजलेला पुरुष? आणि अपेक्षा काय असतात पुरुषांकडून? पुरुष कसा असावा, असं आपल्याला वाटत असतं? आपल्या मनातला आदर्श पुरुष कोणत्या प्रकारचा? असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे आणि त्यांची उत्तरे शोधायची. थोडंसं मागं वळून पाहिलं, तर आपल्याला असं दिसतं की, मीराबाई, जनाबाई यांच्यासारख्या संत कवयित्रींनी परमेश्वरालाच आपला सखा, आपला प्रियकर मानलंय. त्यांच्या मनातला 'पुरुष' परमेश्वर होता. असं का? हाडामांसाचा 'पुरुष' प्रियकर म्हणून न निवडता दगडी मूर्तीत त्यांनी आदर्शपुरुषाची' प्रतिमा पाहिली. (आणि वास्तवात तर त्या पुरुषी व्यवस्थेचा भाग होत्या.)

या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं देत आपण लिहावं, अशी आमची अपेक्षा नाही. किंवा काही तत्त्वज्ञानात्मक लिहावं, असंही आमचं म्हणणं नाही. म्हणजे हे सारं करावंच, पण याखेरीज आपण पाहिलेली पुरुषी व्यवस्था, आपल्याला जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसलेला व्यवस्थेतला 'पुरुष', आपल्याला तो त्या त्या वेळी कसा असावा असं वाटलं, हेही आणि हे सारं घटना, प्रसंग, आठवणी - यांच्या साथीनं यावं. नामोल्लेख महत्त्वाचे नाहीत. प्रतिक्रिया मात्र मनापासूनच्या व अस्सल हव्यात.

एका अर्थाने हा आपल्याला दिसणारा वा दिसलेला 'पुरुष' या प्रकारचा शोध आहे. तो आपण अंत:करणापासून घ्यावा, असं वाटतं. त्यातून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांचा आजचापुरुषविषयक दृष्टिकोन' प्रातिनिधिक स्वरूपात समोर यावा, ही अपेक्षा आहे. आज जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या रेट्यात पुरुषी व्यवस्थाही घुसळून निघत आहे. त्यादृष्टीने या काळात स्त्रियांचं समकालीन व्यवस्थेविषयीचं आकलन व मांडणी महत्त्वाची ठरणार आहे, असं वाटतं.

खास स्त्रियांनीच दिलेली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया; तिचं चित्र यातून उभं राहील व व्यवस्थेसंबंधीच्या आकलनाला त्यातून भरीव काही मिळेल, असा भरवसा वाटतो.

 

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.