1-2

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

मनोगत

Dr.नितीन आरोटे*

*.अगस्ति कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले - ४२२६०१, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत).

Dr.Kalpana Nehere 1

1.Gatha Cognition.

01-02-2017
01-01-2017
01-01-2017
01-02-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

सारांश

मनोगत

पारिभाषिक शब्द

1 . मनोगत

ग्रामसभा ही गावातील नागरिकांची सभा असल्याने लोकशाही शासन प्रशासनाचा पायाभूत घटक आहे; त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही शासनव्यवस्थेत ग्रामसभेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करून शासन व्यवस्थेची दिशा ‘खालून वर’ अशी करणे शक्य आहे. वर्तमान भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेला घटनात्मक अधिकार असले तरी प्रातिनिधिक शासनव्यवस्था मात्र तिला लोकप्रबोधनाचे साधन समजून आपला कारभार चालवित आहे. म्हणून प्रस्तुत विवेचनात ग्रामसभा व तिचे स्वरूप आणि ग्रामीण शासन व्यवस्थेतील तिची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

पहिल्या प्रकरणात ग्रामसभेच्या ऐतिहासिक अधिष्ठानाबरोबर आधुनिक काळातील भारतीय शासन व्यवस्थेतील ग्रामसभेची कार्यपद्धती स्पष्ट करण्यावर भर दिलेला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात भारतीय लोकशाही शासन, प्रशासन तिच्या ग्रामपातळीवरील  कार्यपध्दतीसह  स्पष्ट केलेले  आहे.  तिसर्‍या  प्रकरणात   ग्रामसभेच्या 

कार्यक्षेत्रातील शासन, प्रशासनाच्या रचनात्मक मांडणीचे विश्लेषण केलेले आहे. पंचायतराज व्यवस्थेत बहुस्तर शासन व्यवस्था कार्यरत असून तिचा गावाच्या शासन प्रशासनातील सहभाग विस्ताराने याच प्रकरणात मांडलेला आहे. नागरिक केंद्री विकेंद्रीत शासन व्यवस्थेसाठी ग्रामसभा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी चौथ्या प्रकरणात ग्रामसभेची लोकशाही शासन प्रशासनातील परिणामकता वाढविण्यासाठी पुनर्मांडणी करण्याचे सूत्र मांडलेले आहे.

लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचे समान व्यक्तिमूल्य असले तरी वर्तमान शासनव्यवस्था मात्र बहुमताने निवडून आलेल्या प्रतिनिधिंमार्फत बहुमताधारित निर्णयांवर अवलंबून आहे; त्यामुळे ग्रामसभेकरवी व्यक्तीचे प्रत्यक्ष व्यक्तिमूल्य लोकशाही शासनव्यवस्थेत सामावून घेते; त्यामुळे सूक्ष्म पातळीवर प्रभावी शासन प्रशासनासाठी ग्रामसभा ही सर्वात परिणामकारक लोकशाही शासनव्यवस्था आहे. प्रस्तुत विवेचन ग्रामसभा व तिच्या नागरिकांना प्रभावीपणे कृतिप्रवण होण्यास मदत करेल असा आम्हास विश्वास वाटतो.

2 . ऑनलाइन आवृत्तीच्या निमित्ताने

‘ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ‘स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे’ यांनी एप्रिल २०१६ मध्ये प्रकाशित केली. त्याला नागरिक, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे प्रतिनिधी, शासन-प्रशासनातील अधिकारी, अभ्यासक, इत्यादींनी भरघोस प्रतिसाद नोंदविला; त्याचा आनंद होत आहे.

संज्ञापनक्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. गावागावातील नागरिक संगणक आणि मोबाइल फोनद्वारे एकमेकांना जोडले गेलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या आवृत्तीच्या स्वरुपात शब्दशः लोकांच्या हातात देणे शक्य होत आहे. आता अभ्यासक व नागरिक गरजेप्रमाणे या पुस्तकातील माहिती व विश्लेषणांचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतील.

पुस्तकात काळाप्रमाणे बदलेलली व उपलब्ध झालेली माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. या अधिक महितीसह या पुस्तकाची ऑनलाइन आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद होत आहे. या आवृत्तीत प्रत्येक प्रकरणाला नव्याने सारांश, ठळक वैशिष्ट्ये, आकृत्या, पारिभाषिक शब्द जोडल्याने आशय अधिक ठळक झालेला आहे. त्यासाठी ‘GATHA COGNITION’ च्या व्यस्थापकीय संपादक डॉ. कल्पना यांचे आभार. मुखपृष्ठावरील ग्रामसभा रेखाटली आहे, आयु. विरेन्द्र मेढे यांनी !

संदर्भ