सारांश
पारिभाषिक शब्द
1 . आधारभूत ग्रंथ
हे पुस्तक मुख्यत: पालिभाषेतील सुत्तपिटक व त्यावरील अट्ठकथांवर आधारलेले आहे. विनयपिटकांतील गोष्टींचा यात उपयोग केला असला, तरी त्या सुत्तपिटकाच्या आधारावाचून ऐतिहासिक मानण्यात आल्या नाहीत. अभिधम्मपिटकाचा (एका उता-याशिवाय) उपयोग केला नाही.
जैन वाड्ःमयापैकी आचारांगसूत्र, भगवतीसूत्र, दशवैकालिकसूत्र व प्रवचनसारोद्धार या ग्रंथांतील उतारे घेतले आहेत.
पहिल्या प्रकरणात ऋग्वेदाचा बराच उपयोग केला आहे. उपनिषादांतून बराच मजकूर घेतला आहे.
धर्मसूत्रे व मनुस्मृति यांचाही प्रसंगोपात्त उपयोग केला आहे.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बाणभट्टावरील निबंधातून एक उतारा दिला आहे; पण तो आधारभूत नव्हे.
Arctic Home in the Vedas: by B. G. Tilak.
Myths and Legends of Babylonia and Assyria: by Lewis Spence.
A History of Babylon: by L.W. King.
Buddhist India (1903): by Prof. Rhys Davids.

