Article/Chapter Title :
कुडाची शाळा: सामाजिक शिक्षणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग
संवादगाथा
६
सुरेश खोपडे , मुक्त शिक्षण , ध्येयवेडी मानसं , निसर्ग शाळा , मोरगाव


चाकोरीबद्ध शिक्षणाच्या पलीकडे, मोकळेपणाने, कल्पकतेने आणि स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारी शाळा मुलांचे भविष्य घडविते. त्यासाठी प्रचलित चाकोरीबद्ध शिक्षणात पुरेशी व्यवस्था आढळत नाही, त्यामुळे मुलांचे शिक्षण खुंटलेले, कोमेजलेले आहे. म्हणून मुलांना मुक्त, कल्पकतेनं आणि विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण देण्यासाठी मा. सुरेश खोपडे यांनी ‘कुडाची शाळा’ सुरु केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मत:च वेगळी, अनन्य असते. कोणत्याही दोन माणसांची कौशल्ये, गुण, दोष सारखे असत नाहीत. तर मग एकच चाकोरीबद्ध शिक्षण सर्वांना यशस्वी कसे करेल? मासा, हत्ती, पक्षी, कुत्रा या सर्वांना झाडावरच चढायला लावून कसं चालेल? स्वतःची कौशल्ये स्वतःच ओळखणे आवश्यक आहे. यासाठी पूरक वातावरण शाळांमध्ये उभे करावे लागेल. असे वातावरण उभारण्याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘कुडाची शाळा’ होय.

मोकळेपणानं, कल्पकतेनं आणि स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारी शाळा.
कुडाच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन, दारं नसलेली मुक्त शाळा.
शाळा आहे पण शिक्षक नाहीत, शाळा आहे पण नियमित विद्यार्थी नाहीत.
पारंपारिक शाळा जेथे संपते तेथून कुडाची शाळा सुरु होते.