Article/Chapter Title :
कासाळगंगा: लोकसहभागातून जलविकासाची कहाणी
संवादगाथा
2
जलयुक्त शिवार , नदीखोरे , दुष्काळ , जलसंधारण
डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी या ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील जलसंधारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, समाज व राजकीय व्यवस्थेचा ऐतिहासिक, आर्थिक व समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करून या पुस्तकात मांडलेला आहे. या अभ्यासासाठी डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी अभ्यास क्षेत्रास अनेक भेटी देऊन स्थानिक नागरिक, या विषयातील तज्ञ आणि धुरीण यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अनेक मुलाखती घेऊन महत्वाच्या नोंदी घेतलेल्या आहेत. सदर अभ्यासात आकडेवारी बरोबरच गुणात्मक आकलन आणि विश्लेषणाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे.
पुस्तकात प्रागतिक दृष्टीकोन स्वीकारलेला आहे.
आकडेवारी बरोबरच गुणात्मक आकलन आणि विश्लेषणाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे.
‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक माहितीच्या विश्लेषणाबरोबरच जल टंचाई, नापिकी, मजुरांचे स्थलांतर, इत्यादी समस्यांचे सखोल आकलन या पुस्तकात मांडलेले आहे.
महाराष्ट्राच्या दुष्काळी क्षेत्रातील ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यात विविध संस्थांच्या सहकार्यातून जलविकास प्रकल्प राबविलेला आहे.
राबविलेल्या विकास प्रकल्पात मिश्रशेती, कमी पाण्यात उभी राहिलेली बाजाराभिमुक पीक रचना व जोडीला पशुपालन, दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय यांचा सहभाग दिसून येतो.
