Article/Chapter Title :
आर्यांचा जय
भगवान बुद्ध
१३-२२
अहिंसा , अट्ठकथा , सप्तसिंधु , यज्ञयाग , वैदिक भाषा , कृष्ण , इन्द्र , दास , आर्य , इश्तर , सप्तसिंधुप्रदेश


भगवान बुद्धाचे जीवन व तत्वज्ञान मांडण्यापूर्वी धर्मानंद कोसंबींनी बुद्धपुर्वीच्या समाज व्यवस्थेचे चित्रण केलेले आहे. उदार असलेले ‘दास’ आर्यांच्या आक्रमणाने गुलाम बनले व तंबूत राहणारे आर्य कालक्रमाने घरे बांधून राहू लागले. दास आपसात भांडत असत, त्याचा फायदा आर्यांनी घेतला. दिवोदासाच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली व आपले साम्राज्य स्थापन केले. कृष्णाने इन्द्राच्या यज्ञयागाची संस्कृति आणि वर्चस्व नाकारले. हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेकजन जंगलात जाऊन राहत. याही काळात लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले होते.

या प्रकरणात बुद्धपूर्व समाजाचा आढावा घेतलेला आहे.
आर्यांची सप्तसिंधूवरची स्वारी इ.स.पूर्वी सतराशे वर्षापलीकडे जाऊ शकत नाही.
दास् शब्दाचा मूळचा अर्थ दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे.
दिवोदासाच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली. साम्राज्य स्थापन केले.
आर्यांनी आपसात भांडणा-या दासांना अनायासे जिंकले असल्यास त्यात मुळीच नवल नाही.
दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली.
इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचे वर्चस्व कृष्ण मान्य करण्यास तयार नव्हता.
मध्य हिंदुस्थानातील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला होता.