Article/Chapter Title :
श्रावकसंघ
भगवान बुद्ध
१०९-१३५
पंचवर्गीय भिक्षू , बहुजन , भिक्षुसंघ , श्रमणसंघ , संघटना , भिक्षुणीसंघ , राहुल


गोतम बोधिसत्त्व बुद्धाने सर्वप्रथम कोण्डञ्ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित्) यांना नवीन धर्ममार्ग, ‘धम्म’ सांगितला. हे पंचवर्गीय भिक्षू बुद्धाच्या मार्गाने चालू लागले. या पाचांचा भिक्षूसंघ बनला. भिक्षूसंघात मोठ्या संख्येने तरुण सामील झाले. त्याच्या मार्गाने चालू लागले. भिक्षूसंघ बहुजनहितासाठी धर्मप्रचार करीत होता. भिक्षूसंघात एकोपा राहून तो अधिक कार्यक्षम व्हावा यासाठी बुद्धाने त्याच्या संघटनात्मक रचनेवर विशेष लक्ष दिले. अनेक नियम लोकरूढीवरून ठरविले. साधेपणावर भर देवून वागणुकीचे नियम केले. शरीरोपयोगी पदार्थांच्या वापराबाबत सावधगिरी बाळगली. बुद्धाने स्त्रियांना प्रवज्जा घेण्यास परवानगी देवून भिक्षुणीसंघाची स्थापना केली. भिक्षुणीसंघासाठी त्याने खास नियम केले. बुद्धाने भिक्षूसंघाच्या प्रतिष्ठेला विशेष महत्व देऊन संघच सर्वांचा पुढारी असल्याचे सांगितले.

कौण्डिन्य, वाष्प, भद्रिक, महानाम आणि अश्वजित् या पाचांचा प्रथम भिक्षूसंघ बनला.
भिक्षूसंघ बहुजनहितासाठी धर्मप्रचार करीत होता.
एकोपा टिकविण्यासाठी भिक्षूसंघाच्या संधटनात्मक रचनेवर बुद्धाने भर दिला.
बुद्धाने भिक्षुणीसंघाची स्थापना केली.
बुद्धाने भिक्षूसंघाच्या प्रतिष्ठेला महत्व दिले.