Article/Chapter Title :
कर्मयोग
भगवान बुद्ध
१५४-१६८
क्रान्तिकारक तत्त्वज्ञान , अष्टांगिक मार्ग , सम्यक् मार्ग , शस्रत्याग , कर्मयोग , कुशल कर्मपथ


बुद्धाने जसा शस्रत्याग केला तसाच कठोर तपश्चर्येचासुद्धा निषेध केला. बुद्धाने मानवी कल्याणासाठी नवीन अभिनव मध्यममार्ग शोधून काढला. प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) ही तीन कायिक पापकर्मे; असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड ही चार वाचसिक पापकर्मे; आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि ही तीन मानसिक पापकर्मे होत. त्यांपासून निवृत्त होणे म्हणजे कुशल कर्मपथ होय. यांचा आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगांच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

बुद्धाने जसा शस्रत्याग केला तसाच कठोर तपश्चर्येचासुद्धा निषेध केला.
बुद्धाने नवीन अभिनव मध्यममार्ग शोधून काढला.
बुद्धाने तीन कायिक, चार वाचसिक व तीन मानसिक पापकर्मे (दहा) सांगितले.
बुद्धाने पापकर्मांवर विजय मिळविण्यासाठी कुशल कर्मपथ सांगितला.