Article/Chapter Title :
जातिभेद
भगवान बुद्ध
१८५-२०१
जातिभेद , क्षत्रिय , ब्राह्मण , अब्राह्मण , ब्राह्मणवर्ण , अशोक , जैन संघ , अस्पृश्यता


वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्यहिंदुस्थानात जातिभेदधर्म अस्तित्वात होता. बुद्धाला जातिभेद निरुपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. बुद्धाच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता. बुद्ध सांगतो माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरविता येत नाही. बुद्ध चातुर्वर्ण्य कृत्रिम आसल्याचे सांगतो. अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणा-या देशात संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली.

वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्यहिंदुस्थानात जातिभेदधर्म अस्तित्वात होता.
बुद्धाने जातिभेदाचा सर्वथैव निषेध केला.
बुद्धाच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता.
बुद्ध चातुर्वर्ण्य कृत्रिम आसल्याचे सांगतो.