
0 Reviews | Write Review
180 / $2.54 180.00 / $ 2.54
Summary of Book
सरफराज अहमद यांचे सल्तनत ए खुदादाद हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापेक्षाही या पुस्तकाने टिपू सुलतान विषयी महाराष्ट्रात नवे सामाजिक मुल्यभान निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा केली, याचा अधिक आनंद आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर काही प्रमाणात का होईना टिपू सुलतान यांच्या इतिहासाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला. वसाहतिक इतिहासकारांनी आणि शत्रू पक्षातील साधनांनी घातलेल्या मर्यादांच्या पलिकडे जाउन लोक विचार करायला लागले.
कर्नाटकात टिपू सुलतान जयंतीचा वाद उफाळून आल्यानंतर जमातवादी इतिहासकारांनी पुन्हा जुनेच वाद नव्याने मांडायला सुरुवात केली. त्यावेळी टिपू सुलतानच्या आकलनासाठी 'सल्तनत ए खुदादाद' ची मागणी वाढली होती. सल्तनत ए खुदादाद हे पुस्तक विस्तारीत आहे. त्यामुळे वर्तमान सामाजिक मानसिकतेचा विचार करुन फक्त टिपू सुलतान यांचा इतिहास समजावून सांगण्याचा विचार समोर आला. कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात उपयोगी पडेल अशा छोट्या पुस्तकाच्या स्वरुपात हा विषय मांडण्यासाठी काही मित्रांनी आग्रह केला. त्यातही मागच्या तीन-चार वर्षात टिपू सुलतान यांच्याविषयी मी बरीच नवी माहिती जमवली. त्यांच्या चारशेहून अधिक पत्रांचे भाषांतर करताना काही तथ्ये नव्या रुपात समोर आली. मंदिरांना दिलेल्या देणग्या, आधुनिकीकरणाचे प्रयत्न, वसाहतवादाच्या विरोधामागची भूमिका, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा वेगवेगळ्या विषयावर काही नवी माहिती संकलित केली होती. त्यामुळे मुळ पुस्तकातील काही मजकूर घेउन नव्या माहितीची भर टाकावी आणि हे पुस्तक प्रसिध्द करावे असे वाटले. पण नव्या माहितीच्या अधिकतेमुळे या पुस्तकाला वेगळे स्वरुप आले. विशेषतः पत्रव्यवहारावर आधारीत लेख, धार्मिक धोरणाच्या प्रकरणात दिलेल्या मंदिरांची यादी ही माहीती प्रादेशिक भाषेत प्रथमच येत आहे. त्यामुळे हे पुस्तक सामाजिक चळवळींसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.