loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान
Swatantya andolanatil musalman

0 Reviews | Write Review

116
120 gms
Paper back
978-81-926776-8-2

120 / $1.69 120.00 / $ 1.69

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

प्रा. फडके यांनी या विषयाचा सखोल असा अभ्यास करुन पुराव्यांसह हे दाखवून दिले आहे की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला असून त्यांनी या चळवळीत भाग घेतला नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. या बद्दल आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. सर्व मुसलमान लीगचे समर्थक नव्हते व धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ केल्यामुळे पाकिस्तानची राष्ट्रीयता पक्की झाली नाही. पूर्व बंगाल त्यातून बाहेर पडला व सरहद्द प्रांतात आणि बलुचिस्तानात फुटीरतावादी चळवळी जोर धरीत आहेत. पाकिस्तानमधील शेकडा ४० टक्के भूभागावर केंद्र सरकारचे नियंत्रण नाही! भारताला पाकिस्तान सारखे धर्माधिष्ठित राष्ट्र बनविण्याची इच्छा असणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.

-अशोक चौसाळकर

'स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान' हे डॉ. य दि. फडके यांचे खूप वर्षांपासून इच्छा असूनही बाजारात उपलब्ध नसल्याने वाचता न आलेले पुस्तक नुकतेच वाचले. खरे तर शीर्षकाच्याही खूप पुढे जाणारे हे पुस्तक आहे. १८५७च्या उठावापासून १९४७ पर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती, संघटना, धार्मिक आधारावर ध्रुवीकरण होत चाललेला समाज यांचा मागोवा अतिशय वस्तुनिष्ठपणे यदिंनी या  पुस्तकात घेतलेला आहे. १८५७चा उठाव आणि वासुदेव बळवंत फडकेंसारखे क्रांतिकारी यांच्यामुळे झोप उडालेले इंग्रज भारतीयांना सामाजिक प्रश्नांवरती चर्चा करण्यात गुंतवून ठेवण्यासाठी काँग्रेसरूपी एक सेफ्टी वॉल्व्ह उभी करतात. परंतु काँग्रेस सामाजिक, आर्थिक विषयांपेक्षा राजकीय विषयात जास्त चळवळी करू लागल्याने इंग्रज अस्वस्थ होतात. त्यावर उपाय म्हणून काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी इंग्रज मुस्लिमांना चुचकारतात. मुस्लिमांना अधिक प्रतिनिधित्व, राखीव जागा इ. दिल्या जातात आणि त्यातून मुस्लिम लीग उभी केली जाते. लिग आणि काँग्रेसची अधिवेशने समांतरपणे होत राहतात. लखनौ करार, खिलाफत चळवळ इथपर्यंत बहुसंख्य मुस्लिम काँग्रेसचे समर्थक असतात. लीग देखील आधीच्या या काळात अखंडित राष्ट्राचा पुरस्कार करते. नंतरच्या काळात लीग वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी करते आणि लीगची लोकप्रियता वाढत जाते. काँग्रेसकडून अनेक प्रयत्न करून देखील बॅ. जिना आपल्या मागण्यांवर ठाम राहतात आणि त्यातून देशाची फाळणी होते. हा सगळा घटनांचा पट यदिंनी थोडक्यात पण नेमकेपणाने उलगडला आहे. हिंसक, अहिंसक मार्गाने इंग्रजांना विरोध करणाऱ्या, त्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या, फासावर लटकणाऱ्या अनेक मुस्लिम व्यक्तींच्या, आपल्याला माहित नसणाऱ्या कहाण्या समजतात. काँग्रेसने शेवटी नाईलाजाने फाळणी स्वीकारल्यानंतर "काँग्रेसने आमचा विश्वासघात केला"असं म्हणणारे, फाळणीला विरोध करणारे खुदाई खिदमतचे बादशाह खान आणि आझाद हिंद सेनेत सुभाषबाबूंच्या साथीने लढणाऱ्या अनेक शूरवीर मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा मनात घर करून राहतात.

Omkar Shiralkar यांचे facebook वरील टिपण.

 

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.