
0 Reviews | Write Review
380 / $5.5 380.00 / $ 5.50
Summary of Book
स्त्रीवाद : संकल्पना व सिद्धांत
स्त्रीवादी-स्त्रीमुक्तिवादी चळवळीला आतापावेतो पुरेसा इतिहास आणि पार्श्वभूमी तयार झाली आहे. जागतिक पातळीवर या चळवळीचे अनेक टप्पे आणि विचारप्रवाह आहेत. त्या त्या देशातील परिस्थितीनुसार त्या त्या देशातील विचारवंत, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचे प्रभावी गट चळवळीची आपापल्या परीने वैचारिक मांडणी करीत असतात. परिस्थिती आणि तत्त्वे यांची सांगड घालीत संकल्पनांना नवी परिमाणे मिळत असतात. त्यातून निरनिराळ्या विचारप्रवाहांचे निरनिराळे सिद्धांत आकार घेतात. प्रत्येक विचार प्रवाहाचे वेगळे महत्त्व आणि स्थान असते. कुठल्याही अभ्यासकाला समकालीन चळवळीचा विचार करताना या विविध विचारप्रवाहांची ओळख करून घेणे आवश्यक असते. अखेरीस हे सिद्धांत व विचारप्रवाह यांचा भोवतालच्या परिस्थितीशी विवेकाने अन्वय लावून मगच आपल्या मार्गाची दिशानिश्चिती होऊ शकते.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.