loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
आजची कादंबरी : नोंदी आणि निरीक्षणे
Ajachi kadambari :Nondi ani nirikshane

0 Reviews | Write Review

253
400 gsm
Paper back
978-93-80617-38-1

320 / $4.49 320.00 / $ 4.49

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

सुमारे दोन लक्ष वर्षांआधी पृथ्वीवर पहिला माणूस अवतरला असं समजलं जात असलं, तरी मानवी प्रजातीच्या संस्कृतीची सुरुवात तुलनेनं पुष्कळ अलीकडची आहे. साधारणत: दहा हजार वर्षांआधीपर्यंत माणूस सामान्यतः शिकार करूनच जगत होता. स्थूलमानाने माणूस शेती करायला लागला, तिथून मानवी प्रजातीच्या संस्कृतीची सुरुवात झाली असं मानलं जातं. ही माणसाच्या निसर्गातील ठळक हस्तक्षेपाचीही सुरुवात होय. निसर्गात विविध प्रकारच्या वनस्पती, त्यांच्यावर निर्वाह करणारे प्राणी, त्या प्राण्यांवर निर्वाह करणारे आणखी प्राणी; अशी एकूण असंख्य प्रजातींची सरमिसळ अशी अव्यवस्थेची प्राकृतिक रचना होती. शेतीची सुरुवात हा एक प्रकारचा व्यवस्था उभी करणारा मानवी हस्तक्षेप होता. रानातली झाडे तोडून तिथे धान्य देणारी एकाच एक प्रकारची रोपे, भाजीपाला देणारी रोपे, यांची लागवड करून माणसाने पहिला हस्तक्षेप केला. तरीही गरजेपुरते अन्नधान्य पिकवणे असेच त्याचे आरंभीचे स्वरूप असेल. तिथून आज आपण आजच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया वा तत्सम देशांतील हजारो एकरांमध्ये सलग एकाच जातीचे पीक, अशा हस्तक्षेपापर्यंत आलो आहोत. खेरीज पृथ्वीतून वेगवेगळ्या प्रकारची खनिजे, तेल, असंख्य धातू, यांचे साधारणतः औद्योगिक क्रांतीच्या काळापासून दोहन सुरू आहे व त्याचे आजचे प्रमाण अवाढव्य आहे. आपण अनेक जीवनोपयोगी म्हणविल्या जाणाऱ्या गोष्टींचे उत्पादन करीत आहोत. सुखोपभोगांसाठी वनसंपदेची तोडफोड तर आहेच, खेरीज खाण्यासाठी म्हणून बैल, डुक्कर, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या अशा प्राण्यांचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यांच्या आहारासाठी अन्नधान्य, खेरीज समुद्रातून होत असलेली मासेमारी व तत्सम लूट. स्वत:च्या सुखासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात दोहन करण्याचा आजचा जमाना आहे. पृथ्वीच्या पाठीवरील मनुष्यवस्ती अतोनात वाढली आहे. (एप्रिल २००८ चा आकडा : ६७० कोटी) तथाकथित प्रगतीत अधिक सुखाच्या कामना व अधिक दोहन. मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा इतिहास हा साधारणत: निसर्गातल्या वाढत्या मानवी हस्तक्षेपाचा इतिहास आहे. अर्थात अशा हस्तक्षेपाचा इतिहास हा नुसता दोहनाचा इतिहास नाही; त्याला खरं तर मानवी प्रजातीनं निर्माण केलेल्या आणि बळकट करीत नेलेल्या व्यवस्थांचा इतिहास म्हटलं पाहिजे. अशा व्यवस्थांच्या परस्परमेळातून आणि सांगडीतून जी एक प्रवाही अशी बृहद् व्यवस्था माणसांनी पिढ्यानपिढ्या निर्माण केली, तिला संस्कृती म्हणता येईल. भाषिक व्यवस्था, भाषेमधल्या चिन्हव्यवस्था, प्रतिमाव्यवस्था, ज्ञानव्यवस्था, तंत्रज्ञानाच्या व्यवस्था, दार्शनिक व्यवस्था, आध्यात्मिक व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, राज्यव्यवस्था, बाजारव्यवस्था, मौखिक स्वरांच्या व्यवस्था, दळणवळणाच्या व्यवस्था, भावनिक व मानसिक नियंत्रणाच्या व्यवस्था, सामरिक व्यवस्था... अशा असंख्य मानवनिर्मित व्यवस्थांची नावे सांगता येतील. आपलं पर्यावरण समजून घेणं व त्याचा अर्थ लावून त्याची व्यवस्था लावणं व अशा व्यवस्थेचा आपल्या सामूहिक भल्यासाठी उपयोग करणं ही मानवी समाजाची सर्वसाधारण वृत्ती राहिलेली आहे. आपलं पर्यावरण या प्रतिमेची व्याप्ती आता पृथ्वीपुरती मर्यादित राहिलेली नाहीय, हे आपण जाणतो. आणि हे सगळं तुलनेनं फार कमी काळात माणसानं साध्य केलेले आहे. १५०० कोटी वर्षांपूर्वी महास्फोटानं विश्वाची निर्मिती झाली. आपल्या आकाशगंगेचं वय साधारणतः १३६० कोटी वर्षे आहे. आपल्या पृथ्वीचं आणि सूर्यमंडळाचं वय ४५५ कोटी वर्षे. या तुलनेत मानवी प्रजातीच्या संस्कृतीचं वय फार तर दहा हजार वर्षे. त्यातही गेल्या फक्त दोनशे वर्षात वर उल्लेख केलेल्या व त्या प्रकारच्या व्यवस्था व त्यांच्या परस्परमेळातून संस्कृतीचे बृहद् जाळे उभे राहिलेले आहे. त्याआधीचे मानवी समूहांचे जगणे बव्हंशी शांत सरळ, एकाच एक प्रकारचे असे पिढ्यानपिढ्या होते असे म्हटले पाहिजे.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.