0 Reviews | Write Review
450 / $6.32 450.00 / $ 6.32
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
“मराठी प्रादेशिक कादंबरी : स्वरूप आणि विश्लेषण” हे माझे पुस्तक आपल्या हाती देतांना विशेष आनंद होत आहे. यामध्ये प. महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा महाराष्ट्राच्या चारही स्वाभाषिक विभागातील निवडक ४३ प्रादेशिक कादंबऱ्यांचे स्वरूप केले आहे. प्रादेशिक कादंबरीचे स्वरूप विश्लेषण करण्यासाठी १) भूप्रदेश २) निसर्ग ३) भाषाविशेष ४) समाजजीवन ५) आर्थिक चित्रण ६) सांस्कृतिक जीवन ७) राजकीय पार्श्वभूमी या प्रमुख घटकांच्या आधारे विवेचन केले आहे ‘समूहमनाचा गजर’ प्रादेशिक कादंबरीत ऐकू येतो का? हे अभ्यास करून मांडले आहे. प्रदेशाचा, निसर्गाचा खोलवर संस्कार मानवी जीवनावर होत असतो ते अनुभवाचा अविभाज्य घटक म्हणून कलाकृतीत अभिव्यक्त होत असते. स्वरूप विश्लेषणासाठी निवडलेल्या कादंबऱ्या या प्रमुख मैलावरील कादंबऱ्या आहेत त्या प्रातिनिधीकही आहेत, यामुळे विविध प्रदेशातील समस्या, लोक जीवन आणि संस्कृती त्यामध्ये कशाप्रकारे आली आहे, ते साधार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प.महाराष्ट्रातील २२, मराठवाड्यातील ११, विदर्भ ५, मराठवाड्यातील ५ अशा या संख्येने कमी अधिक कादंबऱ्या आहेत. या निर्मिती संख्येतही प्रादेशिकता आहे. प. महाराष्ट्राचा विकास झपाट्याने झाल्यामुळे तेथे शिक्षण प्रसार झाला. कादंबरी लेखनही अधिक झाले. कोकण मुंबईच्या निकट असल्यामुळे साक्षरतेमुळे लेखन झाले. विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष अपूर्ण असल्यामुळे लेखनास देखील मर्यादा पडल्या. स्वाभाविकच कादंबऱ्याची संख्याही मर्यादित आहे, परंतु एकूण त्यातील निवडक, महत्त्वाच्या वळणावरच्या या सर्व कादंबऱ्या आहेत, त्यामधील प्रादेशिकतेचे, स्वरूप विश्लेषण आपणास भावण्याची खात्री वाटते !
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.