loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
शेतकऱ्याचा असूड
Shetkaryacha Asud

0 Reviews | Write Review

109
172 gms
paper back
978-93-84600-16-7

120 / $1.68 120.00 / $ 1.68

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

विद्येविना मति गेली, मतिविना नीति गेली, नीतीविना गती गेली! गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.

उद्देश, शुद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पाहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यापैकी थोडया बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूने हा पुढील ग्रंथ रचिला आहे. शूद्र शेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐषआरामी असल्याचे योगाने, ब्राह्मण कामगारांकडून नाडले जातात. त्यांपासून त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगाने आपला बचाव करिता यावा असा हेतू आहे, म्हणून ह्या ग्रंथास "शेतकऱ्यांचा असूड" असे नांव दिले आहे.

वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मूळचे जे लोक शुद्ध शेतकरी आपला निर्वाह करू लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करू लागले, ते माळी व जे ही दोन्हीही करून मेंढरें, बकरी वगैरेचे कळप बाळगू लागले, ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आता या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्त बेटी 'व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व काही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत. आतां पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरूपायाने सोडून उदरनिर्वाहास्तव नानात-हेचे धंदे करूं लागले. ज्यांजवळ थोडेबहुत अवसान आहे ते आपली शेती सांभाळून रहातात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडे नागडे व भुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाही, ते देश सोडून जिकडे तिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटें व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटी पेनशने घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीनें पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुलें, ज्यांस विद्येची गोडीच नाही अशी, त्यांची थोडयांच काळांत बाबूके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नावाने पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनी शिपायगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, इनामें वगैरे कमाविली व कित्येक तर शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेच बनून गेले होते. परंतु हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासाठी मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागीरदारांस आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले, कसकशी संकटे भोगिली यांची कल्पना मनांत न येतां, ते ऐत्या पिठावर रेघा ओढून अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लोकांचे संगतीने रात्रंदिवस ऐषआरामांत व व्यसनांत गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत, अथवा ज्यास कर्जाने व्याप्त केले नाही, असे विरळच. आतां जे संस्थानिक आहेत त्यांस जरी कर्जवाम नाहीं, तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राह्मण कारभारी इतके मतलबी, धूर्त, धोरणी आसतात की, ते आमच्या राजेरजवाडयांस विद्येची व सद्गुणांची अभिरूची लागू देत नाहीत. यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचे स्वरूप न ओळखून, आपल्या पूर्वजांनी केवळ आमच्या चैनीकरितांच राज्य संपादन केले असे मानून धर्माचे योगाने अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र रीतीने पाहण्याचे आंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भार टाकून ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंझळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन जातबांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष, परंतु त्यांच्या मनांत जो विचार कधीही आला नाही व जोपर्यंत "ब्राह्मणो मम दैवत" हे वेड त्यांच्या डोक्यातून निघाले नाही, तोपर्यंत कितीही कपाळकूट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेही करून तसे करण्यास कोणी प्रवृत्त झाल्यास बाळपणापासून मनावर जाहलेल्या दृढ संस्कारांमुळे या मतलबी धर्माचे विरूद्ध चार गोष्टी ऐकून त्यांचा विचार करणे त्यांस कोठून रूचणार? व जवळचे कारभारी अगोदर अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमान्याची डाळच शिंजू देणार नाहीत, तशांतून धैर्य धरून एकाद्याने मला तशी सवड दिल्यास मोठया आनंदाने मी यथामति आपले विचार त्यांच्यापुढे सादर करीन.

असो, जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पहाता, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळया शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशूपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल.

हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व पाकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगण्यास नको, असें सहाय्य घडल्यावांचून याची रचना करता आली नसती हे उघडच आहे.

या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्प समजुतीने शोध लिहिले आहेत, त्यांच आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानांत जी जी व्यंगे दिसून येतील, त्यांविषयी मला क्षमा करून गुणलेशांचा स्वीकार करावा. अशी त्यांस माझी विनंती आहे. आणि जरकरिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यांस काही (ग्रंथाधार वगैरे) सुचविणे असेल, तर त्याविषयी त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हास कळवावे. म्हणजे कृतज्ञातापूर्वक अभार मानून दुसऱ्या आवृत्तीचे वेळी त्यांचा योग्य विचार करूं.

श्रीमंत सरकार गायकवाड सेनाखासखेल समशर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो त्यावेळी आपल्या सर्व राजकीय कामातील अमोल्य वेळांत काटकसर करून अप्रतिम उल्हासाने व सप्रेम भावानें मजकडून हा ग्रंथ वाचवून साग्र लक्षपूर्वक ऐकिला व श्रीमन्महाराजांनी आपल्या औदार्याप्रमाणे मला द्रव्यद्वारे मदत करून माझा यथासांग अत्युत्तम आदरसत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा फार फार ऋणी आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हाडपसर, वंगणी, माळयाचे कुरूल वगैरे येथील शूद्र गृहस्थांनी कित्येक वेळा हा ग्रंथ माझ्या तोंडून ऐकला व या ग्रंथांत लिहिलेला मजकूर खरा आहे अशाविषयी त्यांनी आपल्या सहया मजकडे पाठविल्या आहेत.

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.