
0 Reviews | Write Review
गजानन अपिने
200 / $2.8 200.00 / $ 2.80
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
ही शैली सामान्य लेखकाला सहज पेलणारी नाही. तिच्या मागे माणसाबद्दल आणि जीवनाबद्दल एक प्रगाढ सहानुभूती आणि समज असलेले मन आहे. लेखनाकडे पाहण्याची उच्चभ्रू, पांढरपेशी, मध्यमवर्गीय दृष्टी ते उधळून लावते. ती दृष्टी या लेखनाचा स्वीकार कशी करील याची पर्वा न करता हा लेखक एखाद्या हत्तीसारखा आपल्या चालीने चालत राहतो. जगण्याकडे आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याकडे इतक्या गांभीर्याने पाहणारे उच्चभ्रू, पांढरपेशे लेखक आजअभावानेच आढळतात.
स्वत:चा अनुभव त्याच्या ओबडधोबडपणासह मांडायचा असेल तर शैलीची सफाई फारशी उपयोगाची नाही. त्यासाठी वरवर अस्ताव्यस्त पणाचा, पाल्हाळीकपणाचा आभास निर्माण करणारी पण प्रत्यक्षात तशी नसलेली अभिप्रायगर्भ शैलीच उपयोगाची ठरेल. या दृष्टीने पठारे हे येऊ घातलेल्या लेखकांच्या लिहिण्याच्या नव्या वाटा चोखाळत चाललेले, त्यांची वाटचाल थोडीसुकर करणारे कादंबरीकार ठरतात.
पठारे यांची शैली ही सहज अनुकरण करता येईल अशी नाही. त्यामागील मेहनत दिसत नसली तरी ती परिश्रमपूर्वक घडवलेली शैली आहे; आपल्या परिसरातील बोलभाषा आणि प्रमाणभाषा याच्याबमालूम मिश्रणातून ती साकार झालेली आहे. तेव्हा बोलभाषेने संस्कारित अशी जी आपली भाषा आहे ती आपल्या अभिव्यक्तीचे सहज माध्यम म्हणून वापरताना कोणतीही दडपणे मानण्याची गरज नाही, असा आत्मविश्वास पठारे यांची ही शैली नव्या लेखकांच्या मनात जागवणारी ठरेल.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.