
Summary of Book
किल्ले हे ‘राकट-कणखर’ अशा महाराष्ट्र-देशांचे वैभव आहे. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ या ‘आज्ञापत्रा’तील एका विधानात मध्युगीन दुर्गमहात्म्य प्रकट झाले आहे. मध्युगातील कोषागार म्हणून प्रसिध्द असलेला ‘नारायगड’ किल्ला हे इतिहासप्रेमी, पर्यटकांसाठी प्रेरणास्थान आहे. ‘नारायणगड’ या ग्रंथाच्या रूपाने प्रस्तुत लेखकांनी गडाचा इतिहास उलगडून दाखविला आहे. हे लेखन के वळ छंद जोपासणारे नाही तसेच दुर्गजिज्ञासेला संशोधकीय रूप देऊन त्यांनी हा ग्रंथ प्रसिध्द केलेला आहे. त्यांच्या महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा किल्ला जपण्याचा केलेला हा प्रयत्न दुर्गप्रेमींसाठी भूषाणावह आहे. प्राथमिक व दुय्यम साधनांच्या भक्कम आधारावर हा ग्रंथ लिहिलेला आहे.
- डॉ.राजेंद्र भामरे
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.