Article/Chapter Title :
समकालीन धार्मिक परिस्थिती
भगवान बुद्ध
४४-६५
श्रमणसंघ , तपश्चर्या , बालविवाह , साध्वी संघ , आहारव्रत , तपस्विता , परिव्राजक , श्रमण , जातिभेद , यज्ञसंस्कृती


या प्रकरणात बुद्ध काळातील धार्मिक परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. आर्य आणि दासांच्या संघर्षामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशात यज्ञयागाची संस्कृति अस्तित्त्वात आली. असे असले तरी समाजातील अनेक लोक अहिंसा हे तत्त्व मानीत. या तपस्वींमध्ये जातिभेदाला थारा नव्हता. त्यामुळे कोसंबी रामायणात आलेली शंबूकाची कथा काल्पनिक असल्याचे सांगतात. त्याकाळी अनेक श्रमणसंघ होते. संघातील श्रमण अनेक प्रकारच्या तपश्चर्या करीत. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदर होता. असे असले तरी राजे लोक युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञयाग करीत असत. तर सामान्य लोक कर्मकांडात बुडालेले होते. गुप्तांच्या काळापासून जातिभेद बळावला होता. बालविवाहाची प्रथा देखील अस्तित्त्वात आलेली होती.

बुद्ध काळात यज्ञसंस्कृति अस्तित्त्वात आलेली होती.
याच काळात श्रमण संघ अहिंसेचा प्रसार करीत असत.
गुप्तांच्या काळापर्यंत समाजात जातिभेद अस्तित्त्वात नव्हता.
स्त्री श्रमण संघांना समाजात मानाचे स्थान होते.