Article/Chapter Title :
मांसाहार
भगवान बुद्ध
२०२-२१४
मांसाहार , चुन्द लोहार , गोमांसाहार , महावीर , जैन , प्राणिहिंसा , अशोक


परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरी डुकराचे मास खाल्ले आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात. अत्यंत तपस्वी जैनसंप्रदायांतील श्रमण मांसाहार करीत होते. खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते, यासंबंधी सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. परंतु, बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली. प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय.

बुद्ध आणि महावीरस्वामी मांसाहार करीत होते.
आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात.
बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत.
प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी.
बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला.
ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली.
सम्राट अशोक हा प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा होय.