Article/Chapter Title :
दिनचर्या
भगवान बुद्ध
२१५-२२९
प्रसन्न मुखकान्ति , दिनचर्या , सिंहशय्या , मिताहार , चारिका , फिरती गुरूकुले , आर्यमौन , वर्षावास , एकांतवास


बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती. बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळी ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजुबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावात भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रात शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.
रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामात भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामात आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठ्या सावधगिरीने निजत असे. बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात.
बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यात त्याने अतिरेक केला नाही. चारिका म्हणजे प्रवास. बुद्ध सावकाश चारिका करीत. त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. श्रमणांची गुरुकुले अशी मुळीच नव्हती. ते प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत. बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. जेव्हा बुद्ध भगवान भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत. बुद्ध शीलवान होता. तो यथार्थतया धर्मोपदेश करीत असे. तो प्रज्ञावान होता. भिक्षूंपैकी कोणी आजारी असला, तर बुद्ध भगवान दुपारी ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोडया ठिकाणी सापडतो.

बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती.
बुद्ध भिक्षापात्रात सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेले शिजवलेले अन्न एकत्रित घेऊन गावाबाहेर भोजन करीत असे.
बुद्ध भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यान करून संध्याकाळी पुन्हा प्रवास करी आणि रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.
बुद्धाच्या शय्येला सिंहशय्या म्हणतात.
बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता.
बुद्ध भिक्षुसंघासह सावकाश चारिका करीत.
श्रमणांची गुरुकुले प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत.