loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
साकल्याच्या प्रदेशात (निवडक कविता)
Sakalyachya pradeshat ( Nivdak kavita)

0 Reviews | Write Review

डॉ. निळकंठ शेरे,डॉ. धनाजी गुरव ,डॉ. सिसिलिया कार्व्हालो

92
100 gms
Paper back
978-93-86909-03-9

150 / $2.11 150.00 / $ 2.11

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले (१४६६-१९०५) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून सर्वज्ञात आहेत. तत्कालीन पारंपरिक संकेत झुगारून देऊन, संस्कृत, आणि इंग्रजी साहित्याचा आधार सोडून देऊन त्यांनी आपली स्वतंत्र वाट चोखाळली. १८८६ साली लिहिलेल्या ‘कविता आणि कवी’ या कवितेत त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला.

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही कवीला

आहात मोठे? पुसतो तुम्हाला.

याबरोबरच,

कवी तो कसा असेल आननी?

आम्ही कोण म्हणूनि काय पुसता?

असे काही प्रश्न उपस्थित करून,

शब्दशक्तीची तरफ विधीने करि अमुच्या दिली असे

ठेवूनि ती जनताशीर्षावरी, जग उलथुनिया देऊ कसे?

असे म्हणत, कवीच्या शब्दांची ताकद किती असते; याचे प्रत्यंतर घडवून दिले. पुढच्या सव्वाशे वर्षाचे चित्र जणू त्यांनी आपल्या कवितेतून रेखाटून ठेवले होते.

केशवसुतांनी निर्माण केलेल्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नंतरची कविता तपासून पाहता असे दिसून येते की, काळाचा परिपाक त्यांच्या कवितेतून उमटत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली मोडतोड, बाळ सीताराम मर्ढेकर यांनी यथातथ्यपणे शब्दांकित केली, ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहेम्हणत नारायण सुर्वेनी मोडलेला माणूसआपल्या कवितेतून उभा केला. बाबुराव बागुलांनी वेदांआधी तू होतासम्हणत माणसाचे महत्त्व ठसठशीत केले. नामदेव ढसाळांनी गोलपीठा’ वर प्रकाशझोत टाकला आणि, ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा असल्याचे’ प्रत्यंतर घडवून दिले. रॉक कार्व्हालो यांनी ‘जन्म नव्याने घेई ख्रिस्ता’ म्हणून समाजावर कुठाराघात केला. इलाही जमादार यांनी ‘वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?’ म्हणत ‘माणसा’ चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, वाहरू सोनवणे, सुशील पगारिया या कवींनीही ‘सांस्कृतिक मरणावर’ झगझगीत प्रकाश टाकला.

भुजंग मेश्राम यांनी सर्वहारा जाती-जमातीचे अनुभवविश्व बोलीतून नेमके टिपले. ‘जळजळीत आशय, उपरोध, वेदना यासह एका जंगलातून दुसऱ्या जंगलाकडे जाणाऱ्या माणसांचा जीवनाशी चाललेला संघर्ष चित्रीत करताना ‘सार्वत्रिक व सर्व पातळ्यांवरून उठाव’ करीत ‘ऊलगलान’ मांडला.

कवीचं मरान

जीव जाण्यात नसतं

तर समतेचा मेकअप केलेल्या

भुऱ्या संस्कृतीच्या मृगजळावर

एकतर्फी जीव लावण्यात असतं...

असाही खडा सवाल टाकला.

सुजाता महाजनने ‘स्वत:त दडलेल्या परस्त्रीचा शोध’ घेण्याचा प्रयल केला. अजीम नवाज राही यांनी ‘माणुसकीचे व्याकरण विसरणारी दंगलीची आठमूठ भाषा कोणती; त्याची मूळं खोदून काढण्याचा प्रयत्न केला. प्रज्ञा दया पवार फरक शोधू पाहतेय.

कविता लिहिणाऱ्या बाईत

नि रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वेश्येत?

नेमकी कुठं वेगळी असते

विस्थापितांसाठी लढणारी कार्यकर्ती

नि बेस्ट बेकरी हत्याकांडातली जाहिरा एखादी ?

जमातवादी पंज्यात

उर्वरित जगणारी....

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.