loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
नव'उदार' जगाचा उदयास्त
Naw'udar' jagacha udayasta

0 Reviews | Write Review

287
316 gms
Paperback
978-81-939981-4-4

10.00 % OFF 252 / $3.56 280.00 / $ 3.95

Not In Stock

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

विसाव्या शतकाच्या विकासाचे विलोभनीय रंग केव्हाच फिके पडले आहेत. एकविसाव्या शतकाची अवस्था बुडत्याचा पाय खोलात... आहे. गेल्या शंभर वर्षातल्या जगाच्या अफाट विस्ताराचे आणि अकल्पनीय विकासाचे प्रमुख आधार राहिले उदारमतवाद, राष्ट्रवाद, फासीवाद, समाजवाद, आंतरराष्ट्रीयवाद, नवउदारमतवाद आणि जागतिकीकरण,
या घडामोडींनी आधुनिकतेला आणि लोकशाहीला, मानवी हकांना आणि सामाजिक न्यायाला, मानवी सर्जनशीलतेला आणि स्वातंत्र्याला 'न भूतो...' अशा उंचीवर नेऊन ठेवले. तर फासीवादाने आधुनिकतेचे अत्यंत अमानुष रूप दाखवले. उदारमतवाद हे याचे केंद्रीय सूत्र राहिले. निरंतर प्रगतीचे, अफाट समृद्धीचे आणि अमर्याद मानवी स्वातंत्र्याचे 'मनोराज्य' ही त्याने उभे केले.
या शतकाच्या प्रारंभी, नव उदार' जग स्थिरावत आहे असे वाटत असतानाच या साऱ्यांची पडझड झाली. धर्म आणि विवेकवाद, राजकीय इस्लाम आणि हिंदुत्ववाद, औद्योगिक साम्राज्ये आणि तंत्रवैज्ञानिक क्रांती, पर्यावरण आणि विकास, राज्यसंस्था आणि लोकशाही यांचे स्वरूप पालटले. सर्वव्यापी अरिष्टाच्या आणि नवफासीवादाच्या रूपात अवनती समोर येऊ लागली. हे असे का झाले?
या कल्पनाप्रणालींनी आणि त्यांच्या व्यवहारांनी जगड्ड्याळ स्वरूपाचे प्रश्न निर्माण केले. नव्या मानुष जगाविषयीच्या आकांक्षा उंचावल्या आणि अनिश्चितता वाढवली. त्यासाठीची भरभराट आणि अरिष्टग्रस्तता दोन्ही उभी केली. खऱ्या स्वातंत्र्याधिष्ठित जगाकडे जाण्याची शक्यता आणि आवश्यकता जागवली. आणि... जगासमोरचा पर्याय काय' हा प्रश्न समोर आणला!
हे पुस्तक या साऱ्याची मूलगामी चर्चा करते. विविध कल्पनाप्रणालींची व व्यवस्थांची परखड समीक्षा करते. आजच्या प्रश्नांचा मुळापासून वेध घेते; आणि शोधही घेते - जगाच्या नव्या दिशेचा, मानवी 'स्वप्ने वास्तवात आणण्याचा..

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.