
0 Reviews | Write Review
डॉ. आनंद पाटील
10.00 % OFF 445.5 / $ 6.62 495.00 / $ 7.36
Summary of Book
स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा हा धर्माचा आद्य तुलनात्मक अभ्यास आहे. १९३३ साली हा पीएच.डी.चा प्रबंध ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केला होता. इंग्लंडचा अभिजात सांस्कृतिक वारसा म्हणून वेबसाईटवर टाकलेल्या आठ लाख ग्रंथात त्याचा समावेश आहे; ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.
संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, जर्मन व फ्रेंच अशा अनेक भाषातील उद्धृते आणि जगातील भाषाअभ्यासविज्ञानातील समीकरणे मांडून केलेला अनेक धर्मांचा हा तुलनात्मक अभ्यास आहे. वैज्ञानिक दृष्टिने केलेला हा धर्माचा अभ्यास आजच्या सांस्कृतिक संघर्षकाळात फार उपयोगी आहे. पाऊणशे वर्षानंतर त्याचा मराठी अनुवाद आणि व्यासंगपूर्ण संपादन गोवा विद्यापीठाचे माजी इंग्रजी विभाग प्रमुख व आंतरराष्ट्रीय किर्तीचे तुलनाकार लेखक प्रा. डॉ. आनंद पाटील यांनी केले आहे.
आपला समाज, धर्म आणि समग्र देव खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे तर 'धर्माचा वैदिक वाङमयातील उदय आणि विकास' प्रत्येकाने वाचायला हवा. या ग्रंथाचा त्याकाळच्या परिक्षणांचा अनुवाद, डॉ. देशमुखांचा जीवनपट, या क्षेत्रातील संशोधनाच्या विषयांची यादी, व्यासंगपूर्ण दीर्घ प्रस्तावना, उत्कृष्ठ छपाई ही या ग्रंथाचे वैभव वाढवणारी आभूषणे आहेत. वाचकाला समृद्ध करणाऱ्या मौलिक संशोधनाची भर मराठीत पडली आहे.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.