
0 Reviews | Write Review
140 / $1.89 140.00 / $ 1.89
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
अजित पुरोहित यांचा चौंडी कथासंग्रह म्हणजे मराठी ग्रामीण कथेचं खणखणीत नाणंच म्हणावं लागेल. या संग्रहातल्या सर्व कथा अस्सल ग्रामीण कथा आहेत. कथालेखनाच्या तंत्रात कुठेही अडकून न पडता लेखकाने त्या कथा दिलखुलास मनानं लिहिल्या आहेत. त्यांच्या कथा विविध विषयांवरच्या आहेत. आजपर्यंतच्या मराठी ग्रामीण कथांपेक्षा त्यांच्या कथा वेगळ्या आहेत. कथांचं निवेदनही प्रासादिक असून त्या निवेदनात एक प्रकारचा सरळ ओघ आहे. त्यामुळेच त्यांच्या त्या कथाचं सामर्थ्य वेगळं ठरतं. त्या केवळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या नाहीत. त्या कथांमध्ये वास्तववाद ठासून भरला आहे, शिवाय त्या मनोरंजकही आहेत; हेच या कथांचं यश आहे. आजपर्यंतच्या सर्व ग्रामीण कथांत त्यांचे हे वेगळंपण जाणवतं. चाकोरीबद्ध ग्रामीण कथांपेक्षा त्यांची कथा वेगळी आहे.
या संग्रहातली प्रत्येक कथा वैविध्यानं नटलेली आहे. त्यात लहान मुलांची मराठी शाळा आहे. आदरणीय गुरुजी आहेत. लेखकाचे लहानपणीचे सवंगडी आहेत. लेखकाच्या घरातील संस्कारशील माणसं आहेत, रिटायर मिल्ट्रीमन आहेत. एक रुपैचा ऊस पिकवणारा शेतकरी आहे, वडाळ वागणाऱ्या एक - दोन स्त्रियाही आहेत, जनावरं, पक्षी, निसर्ग, शेतं, गुरं-ढोरं हे सारं आहे. अस्सल खेडं वाचकापुढं उभं करण्याचं लेखकाचं कसब अनुपम आहे. प्रत्येक कथा वास्तववादी आहे व आनंददायीही आहे. त्यातल्या सुरस व चपखल संवादांनी कथा खुलत जाते. अनेक अनोखे नवे ग्रामीण शब्द या संग्रहात ठायी ठायी आढळतात. ते वाचताना गंमत वाटून वेगळी आनंददायी अनुभूती येते.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.