loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
अंधश्रद्धेची वावटळ
Andhshraddhechi Wawtal

0 Reviews | Write Review

40
50 gms
Paper back
978-93-83369-10-2

40 / $0.56 40.00 / $ 0.56

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

गेली ३०-३५ वर्षे मी सातत्याने समाजप्रबोधनाच्या कार्यात रस घेत आलोय. वाणी आणि लेखणी यथाशक्ती वापरीत आलो आहे. तसा मी शिक्षणानं संगणक, Computer Engineer) क्षेत्रातला पण साहित्याची आवड तरुणपणातच लागली. त्या काळी आचार्य अत्रे नावाचा एक चमत्कार आम्ही पाहिला. तहानभूक विसरून त्यांची अफाट भाषणे ऐकली. साहित्याची आवड त्यातूनच निर्माण झाली असावी, असे वाटते.

या आयुष्याची पंचाहत्तरी उलटून केव्हाच गेली आहे. तरीही जिथे जिथे म्हणून समाजपरिवर्तनाचा घाट घातला जातो...तिथे तिथे मी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. माझ्या २० पुस्तकांपैकी निम्मी पुस्तके याच विषयांशी संबंधित आहेत. अंधश्रद्धेची वावटळहे पुस्तकही याच विचारांची बांधिलकी सांगणारे आहे. आमच्या ग्रामीण भागातील बहुजन समाज हा अजूनही अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. त्यांना समोर ठेवूनच हे पुस्तक लिहायचे ठरविल्याने प्रत्येक अंधश्रद्धा फक्त एकाच पानावर म्हणजे २५०-३०० शब्दांतच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलायचं तर ग्रामीण भाग आणि शहरी विभाग यामध्ये उडिदामाजी काळे-गोरे काय निवडावे असा प्रकार आहे. खेड्यातील अंधश्रद्धा खेडवळ तर शहरातील थोड्या Sophisticated एवढाच काय तो फरक. पु. ल. शहरी मंडळींच्या अंधश्रद्धांना Air Condition अंधश्रद्धा म्हणतात. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रामीण भागातील ठळक अंधश्रद्धा म्हणजे नवस बोलणे, तो फेडण्यासाठी पशुबळी देणे, भूता-खेतांवर, करणीवर विश्वास ठेवणे तर शहरी लोकांच्या आवडत्या अंधश्रद्धा म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र, रेकी, गर्भसंस्कार इत्यादी.

मला नेहमी असे वाटत आले आहे की, अंधश्रद्धा म्हणजे विकासाच्या गाडग्याला पडलेले भले मोठे भोक आहे. तुम्ही या विकासाच्या गाडग्यात विकासाचे कितीही पाणी ओता ते कधीच भरले जाणार नाही, पण हे कोणी लक्षात घेत नाही याचे मोठे वैषम्य वाटते, या उलट सद्यःस्थितीला तर आपल्या समाजात जेवढ्या अंधश्रद्धा बोकाळल्या आहेत, तेवढ्या यापूर्वी कधीच बोकाळल्या नव्हत्या. आमची वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या तर मोठ्या मोठ्या जाहिरातीच्या आधारे अंधश्रद्धांचा जणू रतीबच घालीत आहेत. दरवर्षी पंढरीची वारी निघते. दरवर्षी प्रत्येक चॅनेल वारीचं चित्रण-तेही नको तितकं करीत असते.

 

 

Preview

Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.