loader
Skip to content
Gatha Cognition®
Cover of संवादगाथा

Book Free to read

संवादगाथा

अनियतकालिक

मुख्य संपादक: Dr. Sominath Gholwe · व्यवस्थापकीय संपादक: Dr. Kalpana Bhagat

2018 3 chapters Marathi

About this book

‘संवादगाथा’ हे गाथा कॉग्निशनने ऑनलाइन अनियतकालिक सुरु केले आहे. यामध्ये विविध विषयांवर लेख, लघुकथा, संवाद, वार्तांकन, इत्यादी प्रकारचे साहित्य प्रकाशित केले जाते. अर्थातच संवादगाथेची व्याप्ती मर्यादित नाही. प्रामुख्याने समाज, स्त्रिया, विद्यान, शिक्षण, शेती, संस्कृती, इत्यादी बाबतचे वैद्यानिक दृष्टीकोनातून लिहिलेले साहित्य प्रकाशित केले जाते.  

संवादगाथा फक्त एक मांडणी नाही तर एक वाट आहे - विचारांची, प्रश्नांची, आठवणींची आणि भावनांची. या ठिकाणी जीद्यासू लोक शब्द संवाद साधतात, विचारला आकार देतात आणि अनुभव जपतात. 

खरच, ‘प्रत्येक मनात एक गाथा असते, आणि प्रत्येक गाथेला संवादाची गरज असते.’ 

तुमच्याकडेही आहे का अशी गाथा? 

तिचं रुपांतर संवादामध्ये करूया. शब्दांमधून संवाद करूया. 

संवादगाथा हे तुमची जागा आहे.

तर चला आपले साहित्य office@gathacognition.com वर नक्की पाठवा, आम्ही अगदी कमी वेळात त्याला वाचकांपुढे सदर करू.

Contents

  1. सामाजिक लेख
  2. pp. ६ Open access

    कुडाची शाळा: सामाजिक शिक्षणाचा नाविन्यपूर्ण प्रयोग

    Gatha KV

    चाकोरीबद्ध शिक्षणाच्या पलीकडे, मोकळेपणाने, कल्पकतेने आणि स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारी शाळा मुलांचे भविष्य घडविते. त्यासाठी प्रचलित चाकोरीबद्ध शिक्षणात पुरेशी व्यवस्था आढळत नाही, त्यामुळे मुलांचे शिक्षण खुंटलेले, कोमेजलेले आहे. म्हणून मुलांना मुक्त, कल्पकतेनं आणि विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण देण्यासाठी मा. सुरेश खोपडे यांनी ‘कुडाची शाळा’ सुरु केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मत:च वेगळी, अनन्य असते. कोणत्याही दोन माणसांची कौशल्ये, गुण, दोष सारखे असत नाहीत. तर मग एकच चाकोरीबद्ध शिक्षण सर्वांना यशस्वी कसे करेल? मासा, हत्ती, पक्षी, कुत्रा या सर्वांना झाडावरच चढायला लावून कसं चालेल? स्वतःची कौशल्ये स्वतःच ओळखणे आवश्यक आहे. यासाठी पूरक वातावरण शाळांमध्ये उभे करावे लागेल. असे वातावरण उभारण्याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘कुडाची शाळा’ होय.

    2,745 views 2025

    Read PDF Cite

  3. पर्यावरणीय लेख
  4. pp. 4 Open access

    जुन्नर आणि संगमनेर वनविभागतील मानव-वन्यजीव संघर्ष

    Yogesh Badhe, Ravindra Jaybhaye

    २१ व्या शतकात पर्यावरणासंदर्भातील प्रश्न स्थानिक ते जागतिक पातळीपर्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या वाढत्या आव्हानांना सामोरे जाताना विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणं अत्यंत जिकिरीचं आणि महत्त्वाचं कार्य बनलेले आहे. या पार्श्वभूमीवर मानव व वन्य प्राण्यांमधील संघर्ष ही एक गंभीर समस्या अनेक भागांमध्ये बनलेली आहे. विशेषतः बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल आणि वानर यांसारख्या वन्यप्राण्यांशी मानवी संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. जुन्नर व संगमनेर वन विभागांमध्ये मानव व बिबट्यांमधील संघर्ष अधिक गंभीर बनलेला आहे. या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे वनक्षेत्रांवरील मानवी अतिक्रमण, ज्यामुळे या भागातील पर्यावरण परिसंस्था कमकुवत झालेली आहे. बिबट्यां सारख्या वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात घट झालेली आहे. परिणामी बिबट्या आणि इतर वन्य प्राणी भक्ष्याच्या शोधात ग्रामीण व निमशहरी लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष अपरिहार्यपणे पुढे आला. जुन्नर आणि संगमनेर या वनविभागातील वनांच्या शेजारील लोकवस्त्यांमधील मानसं आणि पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होताना दिसून येतात. एका बाजूला वन्य प्राण्यांच्या अन्न व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे मानवी वस्तीतील शेती, पशुपालन आणि एकंदर मानवसुरक्षा धोक्यात आली आहे. या संघर्षाचे मूळ कारण सामाजिक-आर्थिक विषमता, निसर्गाच्या मूलभूत तत्त्वांना दुर्लक्षित करणारे विकास मॉडेल, धोरणांमधील सुस्पष्टतेचा अभाव आणि त्या संबंधित योजनांची अपुरी व कमकुवत अंमलबजावणी यांमध्ये दडलेले आहे.

    1,383 views 2025

    Read PDF Cite

  5. ग्रंथ परिचय
  6. pp. 2 Open access

    कासाळगंगा: लोकसहभागातून जलविकासाची कहाणी

    Vijay Bhagat

    डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी या ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील जलसंधारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, समाज व राजकीय व्यवस्थेचा ऐतिहासिक, आर्थिक व समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करून या पुस्तकात मांडलेला आहे. या अभ्यासासाठी डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी अभ्यास क्षेत्रास अनेक भेटी देऊन स्थानिक नागरिक, या विषयातील तज्ञ आणि धुरीण यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अनेक मुलाखती घेऊन महत्वाच्या नोंदी घेतलेल्या आहेत. सदर अभ्यासात आकडेवारी बरोबरच गुणात्मक आकलन आणि विश्लेषणाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे.

    1,082 views 2025

    Read PDF Cite

Bibliographic information

Published
9 Sep 2018
Language
Marathi
मुख्य संपादक
Dr. Sominath Gholwe
Gatha Cognition
व्यवस्थापकीय संपादक
Dr. Kalpana Bhagat
Gatha Cognition.
Chapters
3