0 Reviews | Write Review
120 / $1.68 120.00 / $ 1.68
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
विचार, तत्त्वज्ञान आणि मूल्ये ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची मांडणी आचरणाच्या भूमिकेतून डॉ. मिलिंद कसबे यांनी या ग्रंथात केली आहे. आंबेडकरवादी विचार आणि खुद्द डॉ.
आंबेडकर यांचे रूपांतर प्रतीकात आणि भक्तिभावात करण्याची ही जणू काही चढाओढ सुरू आहे. या बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणाऐवजी श्रद्धेकडे अधिक झुकवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. अर्थात, याचा खूप तोटा होणार आहे. माणसाचं जग बदलण्यासाठी प्रतीकाऐवजी विचारच क्रांतिकारी भूमिका बजावत असतात.
आंबेडकरी विचार म्हणजे नेमके काय, त्यांचे आचरणात अस्तित्व असणे म्हणजे काय, विचारांचा विधायक परिणाम घडवणे म्हणजे काय आणि सद्यःस्थिती काय, या साऱ्यांचा डॉ.कसबे यांनी तटस्थ वृत्तीने आणि भक्तिभाव, श्रद्धा यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला वेध म्हणजे हा छोटेखानी ग्रंथ आहे. डॉ. आंबेडकर यांचा विचार आचरणात आणल्याशिवाय बदल घडवता येत नाही आणि त्यासाठी लढताही येत नाही. आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी हे लेखन खूपच उपयुक्त आहे.
उत्तम कांबळे (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.