loader
Skip to content
Gatha Cognition®
Cover of ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

Book Open Access

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

  1. अगस्ति कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले - ४२२६०१, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत).
  2. Post-graduate Research Centre in Geography, Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole-422601, Ahmednagar, Maharashtra (India).

2017 6 chapters Marathi ISBN 978-81-932622-0-7 DOI 10.21523/gcb2

About this book

‘ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी’ हे पुस्तक चार प्रकरणांत विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात ग्रामसभेच्या ऐतिहासिक अधिष्ठानाबरोबर आधुनिक काळातील ग्रामसभेची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे. या प्रकरणात ग्रामसभा बैठक आयोजनाची पध्दती, ग्रामसभा बैठकीसमोर येणारे विषय, ग्रामसभा बैठकीकीतील नागरिकांचा सहभाग, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे ग्रामसभा बैठकीतील स्थान व सहभाग, वरिष्ठ शासनातील लोकप्रतिनिधींचा ग्रामसभा बैठकीतील सहभाग, गणपूर्ती, तहकुब बैठकीचे पुनर्योजन, अदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांचे विशेषाधिकार, अदिवासी क्षेत्रातील ग्रामसभा बैठकांचे आयोजन, ग्रामसभांचे प्रचलित अधिकार व कार्ये, ग्रामस्तरावरील विविध समित्या व त्यांची कार्यपद्धती, इ. बाबतीत सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून या प्रकरणातील माहिती ग्रामसभेचे व्यवस्थापकीय घटक – सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शासनातील अधिकारी व सेवक यांच्यासाठी हे उपयुक्त आहेच पण नागरिकांना गावाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

दुसर्‍या प्रकरणात ग्रामस्तरापर्यंत भारतीय लोकशाही शासन-प्रशासनाची रचनात्मक मांडणी स्पष्ट केलेली आहे. ही रचनात्मक मांडणी स्पष्ट करणारा आराखडा व शासन-प्रशासनातील प्रत्येक घटकाची ग्रामपातळीवरील भूमिका, कार्ये, व जबाबदारी याच प्रकरणात स्पष्ट केलेली  आहेत.     

तिसर्‍या प्रकरणात ग्रामपातळीवरील शासन, प्रशासन व पंचायत व्यवस्थेतील घटकांची भूमिका, त्यांचे अधिकार, कार्ये, ग्रामस्तरावरील जबाबदार्‍या यांची मांडणी केलेली आहे. ग्रामसभा आणि शासन-प्रशासनातील घटकांचा कार्यकारी संबंध याच प्रकरणात स्पष्ट केलेला आहे.

ग्रामसभा ही गावातील नागरिकांची सभा असल्याने लोकशाही शासन-प्रशासनाचा पायाभूत घटक आहे; त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही शासनव्यवस्थेत ग्रामसभेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करून शासन व्यवस्थेची दिशा ‘खालून वर’ अशी करणे शक्य आहे. परंतु, सध्याची ग्रामसभा ह्या ग्रामपंचायत या हितसंबंधी घटकाच्या प्रभावात कार्यरत असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण लेखकांनी नोंदविलेले आहे. प्रचलित ग्रामसभेचे मर्यादित यश तिच्या संघटनात्मक दुर्बलतेत आहे. म्हणून सक्षम ग्रामसभेच्या उभारणीसाठी संघटनात्मक सुधारणा चौथ्या प्रकरणात विस्ताराने विशद केलेल्या आहेत. या सुधारणा केल्यास ग्रामसभेला बळकटी मिळेल असा विश्वास लेखकांना वाटतो.

ग्रामसभा ही लोक प्रबोधनाचे साधन नसून ती भारतीय लोकशाही शासन-प्रशासनात पायाभूत घटक असलेली विशेष, चिरंतन ‘सभा’ आहे. ग्रामसभेचे हे विशेष स्वरूप उभारण्याच्या दृष्टीने या पुस्तकात मांडणी केलेली आहे.

भारतातील प्रत्येक नागरिकाला हे पुस्तक उपयुक्त आहेच, पण लोकप्रतिनिधी, शासनाचे अधिकारी-कर्मचारी यांना ग्रामस्तरावर दैनंदिन व्यवस्थापन व विकासासाठी हे पुस्तक कार्यक्षम बनण्यास मदत करते.

Contents

  1. ग्रामसभा
  2. pp. 1-2 Open access

    मनोगत

    ग्रामसभा ही गावातील नागरिकांची सभा असल्याने लोकशाही शासन प्रशासनाचा पायाभूत घटक आहे; त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाही शासनव्यवस्थेत ग्रामसभेच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करून शासन व्यवस्थेची दिशा ‘खालून वर’ अशी करणे शक्य आहे. वर्तमान भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेला घटनात्मक अधिकार असले तरी प्रातिनिधिक शासनव्यवस्था मात्र तिला लोकप्रबोधनाचे साधन समजून आपला कारभार चालवित आहे. म्हणून प्रस्तुत विवे

  3. pp. ३-४६ Open access

    ग्रामसभा : उत्पत्ती व स्वरूप

    नितीन आरोटे, Vijay Bhagat

    भारतीय शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे स्थान ऐतिहासिक आहे. आधुनिक लोकशाहीत देखील ग्रामसभेचे अस्तित्व संविधानाद्वारे अधोरेखित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रकरणात अधिनियमाद्वारे निश्चित केलेली ग्रामसभेची व्याप्ती व पद्धती स्पष्ट केलेली आहे. आदिवासी क्षेत्रातील ग्रामसभांच्या विशेष अधिकारांचे विश्लेषणही या प्रकरणात आहे. असे असले तरी, वर्तमान शासन-प्रशासन व्यवस्था मात्र ग्रामसभेला केवळ लोकप्रबोधनाचे साधन असल्याचे मानून कारभार चालवत आहे.

    10.21523/gcb2.1702 62,002 views 2017

    Read PDF Cite

  4. pp. ४७-७६ Open access

    भारतीय लोकशाही शासन व प्रशासन

    नितीन आरोटे, Vijay Bhagat

    भारतातील बहुस्तर शासन-प्रशासनाची रचना, शासनातील विविध संरचना व यंत्रणा यांची सुत्रबद्ध मांडणी या प्रकरणात केलेली आहे. तसेच शासन-प्रशासन यंत्रणेचा ग्रामसभेशी असणारा कार्यकारी संबंध प्रस्तुत प्रकरणात विशद करण्यात आलेले असून ते गावाच्या क्षेत्रात काम करणार्‍या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना उपयुक्त आहे.

    10.21523/gcb2.1703 17,951 views 2017

    Read PDF Cite

  5. pp. ७७-९३ Open access

    ग्रामपातळीवरील शासन-प्रशासन

    नितीन आरोटे, Vijay Bhagat

    भारतीय शासन व्यवस्थेत गाव हा सुरवातीपासूनच राज्य कारभारचा स्थानिक घटक आहे. वर्तमान शासन व्यवस्थेत ग्रामपंचायत ग्रामपातळीवर कार्यरत असली तरी वरिष्ठ शासन-प्रशासनातील विविध यंत्रणा व विभागांचे अधिकारी, कर्मचारी देखील ग्रामपाळीवर कार्यरत आहेत. गावाच्या हद्दीत काम करणार्‍या प्रत्येक घटकाचे कार्ये व जबाबदारी यांचा ग्रामसभेशी असणार्‍या संबंधाचे विश्लेषण या प्रकरणात केलेले आहे.

    10.21523/gcb2.1704 14,482 views 2017

    Read PDF Cite

  6. pp. ९३-१०८ Open access

    सक्षम ग्रामसभा

    नितीन आरोटे, Vijay Bhagat

    प्रचलित शासन व्यवस्थेत ग्रामसभेचे मर्यादित स्वरूप हे नागरिकांचा लोकशाहीतील सहभाग व ग्रामविकास यांचा संकोच करते. ग्रामसभेच्या संघटनात्मक मांडणीत सुधारणा केल्यास ग्रामसभा ही शासन व्यवस्थेत ‘खालून वर’ काम करणारी प्रभावी व्यवस्था ठरेल. म्हणून, प्रस्तुत प्रकरणात ग्रामसभेसाठी संघटनात्मक सुधारणा सुचविलेल्या आहेत.

  7. pp. १०८-११० Open access

    संदर्भ

    नितीन आरोटे, Vijay Bhagat

    गर्गे, स. मा., १९८७. भारतीय समाज विज्ञान कोश. समाज विज्ञान मंडळ, पुणे, पहिली आवृत्ती १९८७. ग्रामविकास विभाग, २०१०. ग्रामसभा बळकटीकरण अभियान. ग्रामसभा माहिती पुस्तिका. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई. चौधरी द. ह., चौधरी अ. द. आणि चौधरी रा. अ., २०११. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) आणि त्याखालील नियम. चौधरी लॉ पब्लिशर्स, जळगाव. जिल्हा परिषद व पंचायत समिति अध

Bibliographic information

Published
30 Jan 2017
ISBN
978-81-932622-0-7
Language
Marathi
व्यवस्थापकीय संपादक
Dr. Kalpana Bhagat
Gatha Cognition.
Chapters
6