प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे
यशवंत मनोहर यांचे ‘प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे’ हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे. व्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे. मह… Read more
Frequently Bought Together
Summary
यशवंत मनोहर यांचे ‘प्रतिभावंत साहित्यिक : अण्णा भाऊ साठे’ हे पुस्तक अण्णा भाऊंच्या अग्निप्रतिभेचे अन्वर्थन करणारे आणि तिची महत्ता प्रस्थापित करणारे मराठी चर्चाविश्वातले एक अनन्य पुस्तक आहे.
व्यवस्थाभंजन आणि पर्यायसर्जन किंवा अनिष्टविसर्जन आणि इष्टसर्जन हेच अण्णा भाऊंच्या प्रतिभेचे यथार्थ नाव आहे. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीची सांगड घेऊन अण्णा भाऊ मूलतत्त्ववादी मराठी साहित्यप्रवाहाच्या विरुद्ध पोहत होते. या पोहण्यानेच त्यांच्या प्रतिभेला तेजःपुज केले. या पाशवी विरोधांनीच अण्णा भाऊंच्या प्रतिभेला लखलखती धार लावली. सामान्यांना हतबल करणारी दुःखे प्रतिभावंतांपुढे स्वतःच हतबल होतात. ही प्रक्रिया प्रतिभावंतांना ज्ञाताची कुंपणे ओलांडणारे पंख देते.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात अभावांवर, अन्यायांवर आणि उपेक्षेवर मात करणाऱ्या उमेदींची अजिंक्य गाज आहे. हे माणसाच्या आदिम ऊर्जेचेच शक्तिसौष्ठव आहे. महाराष्ट्रात एक संघर्षच लिहीत होता त्या संघर्षाने अण्णा भाऊ साठे हे नाव घेतले होते. या संघर्षाची प्रतिभा अंधारातल्या आरशासारखी निरुपयोगी नव्हती तर ती अंधारनिर्मूलन करणाऱ्या उजेडाच्या आंदोलनासारखी होती. यशवंत मनोहर यांचे हे अभिवादनपुस्तक जन्मशताब्दीच्या निमित्ताने अण्णा भाऊंच्या युद्धप्रतिभेला अंतःकरणपूर्वक प्रणाम करीत आहे.
Preview
Product details
| Title | प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे |
| Title (English letters) | Pratibhawant sahityik Anna Bhau Sathe |
| Author | यशवंत मनोहर |
| Publisher | सनय प्रकाशन, नारायणगाव. |
| Language | Marathi |
| Formats | Paperback |
| Binding | Paper back |
| Pages | 168 |
| Weight | 150 gms |
| ISBN | 978-93-84600-41-9 (PB) |
| Category | Social Sciences |
0 reviews
More in Social Sciences View all →
मनुस्मृती देशाला लागलेला कलंक (मराठी अनुवाद- प्रा.डॉ. दत्तात्रय मोहिते)


कुळवाडी भूषण रयतेचा राजा शिवाजी
महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी ऊठ मऱ्हाठ्या ऊठ
शाहू महाराज: एक थोर राष्ट्रपुरुष
You have to sign in to your account to post a review.