वैज्ञानिक भौतिकवाद (मराठी अनुवाद : डॉ. विजय भगत )
माणूस जन्माला आल्याबरोबर नाकाद्वारे फुफ्फुसात हवा खेचून घेतो, ऑक्सिजन मिळवितो, घश्यातून आवाज काढून आईला हाक मारतो, आईच्या स्तनाला तोंड लागताच दुध प्यायला सुरुवात करतो, ऊन-वारा इत्यादीपासून संरक्षण मागायला लागतो, समाजातून भाषा शिकतो, आपलं जीवन आपल्या भोवतालाबरोबर विकसित करतो, भोवतालाकडून जीवनावश्यक ब… Read more
Frequently Bought Together
Summary
माणूस जन्माला आल्याबरोबर नाकाद्वारे फुफ्फुसात हवा खेचून घेतो, ऑक्सिजन मिळवितो, घश्यातून आवाज काढून आईला हाक मारतो, आईच्या स्तनाला तोंड लागताच दुध प्यायला सुरुवात करतो, ऊन-वारा इत्यादीपासून संरक्षण मागायला लागतो, समाजातून भाषा शिकतो, आपलं जीवन आपल्या भोवतालाबरोबर विकसित करतो, भोवतालाकडून जीवनावश्यक बाबी मिळवितो, तसेच भोवतालाला शक्य ते देत राहतो, माणूस आणि आसपास यांच्यात सतत संवाद चालू असतो, भोवताल जसा माणसाला घडवितो तसाच माणूससुद्धा भोवतालाला घडवितो. भोवतालाबरोबर माणसाचा घनिष्ट संबंध आहे, याची जाणीव माणसाला असतेच. त्यामुळेच माणसाने अनेक वैज्ञानिक शोधांच्याआधारे आपले जीवन सुलभ केले, अन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण केले, अनेक रोगांवर मात केली, प्रवासाचा वेग वाढविला, संवादाची अतिवेगवान साधने विकसित केली, अनेक दिवस अंतराळात मुक्काम केला, माणूस चंद्रावरसुद्धा जाऊन आला, पृथ्वीच्या पोटात जसा तो खोलवर पोहोचला तसाच सूर्याच्यासुद्धा बराच जवळ गेला आहे. मात्र, या विज्ञान युगातसुद्धा माणसांचा मोठा भाग अत्यंत सनातन, मागास, मृत, टाकाऊ स्वरूपाचे विचार घेऊन जगत आहेत. तशाच स्वरूपाचे विचार त्यांच्या भोवताली आहेत, रूढी, परंपरा, धार्मिक शिकवण, ग्रंथ, समाजातील चर्चा, संवाद यातून त्यांचा प्रचार आणि प्रसार सुरूच आहे. वास्तवाचा विपर्यास करून लोकांना अज्ञानात लोटले जात आहे. त्यातून सामाजिक दृष्ट्या मागास-पिचलेल्या लोकांचे शोषण तर होतेच पण त्यांना दुय्यम स्वरूपाचे जीवन जगावे लागत आहे. मानवी आणि सामाजिक उन्नतीसाठी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे आवश्यक आहे. मात्र, लोकांना विज्ञानाची गोड फळं तर चाखायला हवीतच पण त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन नको आहे.
वैज्ञानिक शोध आणि त्यांचा मानवी उपयोग सांगणारी अनेक साधने उपलब्ध असली तरी भौतिकवादी दृष्टीकोनातून वैज्ञानिक विचार विकसित करणारी साधने मात्र मर्यादितच आहेत. जिज्ञासू लोकांसाठी महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी भौतिकवादी दृष्टीकोनातून वैज्ञानिक विचार मांडणारा अत्यंत महत्वाचा ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ हा ग्रंथ हजारीबाग येथील सेन्ट्रल जेलमध्ये लिहून १९४२ साठी प्रसिद्ध केलेला आहे. महापंडीत राहुल सांकृत्यायन यांनी या विषयाची तात्विक मांडणी तर केलेली आहेच पण ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ हे एक महत्वपूर्ण ‘दर्शन’ सुद्धा विकसित केलेले आहे. हा अत्यंत कठीण आणि क्लिष्ट विषय सहज-सोपा करण्यासाठी त्यांनी अनेक निरीक्षणे, नोंदी व प्रमाणित शोध यांचे दाखले या ग्रंथात दिलेले आहेत. त्यामुळे मानवी उन्नतीसाठी तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ हे राहुल सांकृत्यायन यांचे एक महत्वपूर्ण योगदान आहे.
महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा अत्यंत महत्वाचा ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ हा ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध व्हावा ही मराठी वाचकांची इच्छा होती. एक दिवस अगदी सकाळी सकाळीच प्रसिद्ध लेखक मा. गौतम ऐनापुरे यांचा फोन आला, सविस्तर चर्चा झाली, तीच या ग्रंथाच्या मराठी भाषांतराची प्रेरणा आणि उर्जा ठरली. लेखक गौतम ऐनापुरे यांच्या प्रेरणेनेच मला या ग्रंथाच्या तळाकडे जाण्याचा अनुभव घेता आला. ‘वैज्ञानिक भौतिकवाद’ हा अनुवाद मराठी वाचकांच्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे.
Preview
Product details
| Title | वैज्ञानिक भौतिकवाद (मराठी अनुवाद : डॉ. विजय भगत ) |
| Title (English letters) | Vaidnyanik Bhautikvad (Translated by Dr. Vijay Bhagat) |
| Author | Rahul Sankrityayan |
| Translator | Vijay Bhagat |
| Publisher | GATHA COGNITION |
| Language | Marathi |
| Formats | Paperback |
| Binding | Paperback |
| Pages | 180 |
| Weight | 205 gms |
| ISBN | 978-93-93817-21-1 |
| Category | Philosophy |
Author · 3 books on Gatha Cognition
Translator
0 reviews

आस्तिकशिरोमणी चार्वाक
You have to sign in to your account to post a review.