सिंह सेनापती ( मराठी अनुवाद : डॉ. विजय भगत ) - Gatha Cognition

loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
New
सिंह सेनापती ( मराठी अनुवाद : डॉ. विजय भगत )
Singh Senapati (Translated by Dr. Vijay Bhagat)

1 Reviews | Write Review

309
280 gms
Paperback
978-93-93817-02-0

20.00 % OFF 320 / $3.37 400.00 / $ 4.21

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 50/-

2. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

वैशाली हे प्राचीन भारतातील एक समृद्ध गणराज्य होते. 'सिंह' हा वैशालीचा बुद्धकाळातील सेनापती होता. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेली सेनापतीची ही कथा विटांवर कोरून जतन केलेली आहे. ही केवळ एका पराक्रमी सेनापतीची शौर्यगाथा नाही, तर ती त्या भारताची कथा आहे, जेथे समृद्ध शेती, फळबागा, पशुपालन आणि व्यापार होता, गणराज्ये होती, त्या गणराज्यांमध्ये लोकशाही होती, शौर्याला बुद्धीची साथ होती, अमाला प्रतिष्ठा आणि मूल्य होते.

महान वैशाली गणाचा सेनापती सिंह हा तक्षशिलेत शिक्षण घेणारा प्रतिभाशाली विद्यार्थी होता तसाच अद्वितीय योद्धा आणि मानवतावादी नेताही होता. युद्धात शत्रूच्या जखमी सैन्यावर सुद्धा औषधोपचार करणारा, दासांना मुक्त करणारा, लोकशाही मूल्य जोपासणारा सेनापती सिंह अखेरीस तथागत गौतम बुद्धांच्या मागनि जातो. हा केवळ सेनापती सिंहचा प्रवास नसून तो त्याकाळातील संपूर्ण मानवी संस्कृतीचा आरसा आहे.

या कथेतील श्री केवळ पुरुषप्रचान सौंदर्याची प्रतिमा नाही तर रणांगणात खांद्याला खांदा लाऊन लढणारी, निर्भय, शूर आणि पराक्रमाचा इतिहास घडविणारी आहे. रोहिणी, भामा, क्षेमा यांच्यासारख्या कर्तबगार खिया श्रीत्वाची नवी व्याख्या सांगतात, कोमल, नाजुक, अबला यांनी बंदिस्त केलेली स्त्रीत्वाची चौकट मोडून वृध्दीमत्ता, कणखरपणा, शौर्य आणि समता सांगणारी वेगळी सौंदर्यदृष्टी वाचकांसमोर उभी करतात.

लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता, स्त्रीवाद यांसारख्या आधुनिक मूल्यांनी समृद्ध असलेला हा इतिहास आपल्याच मातीत रुजलेला होता याची गोड आठवण 'सिंह सेनापती' ही कादंबरी करून देते.

महापंडित राहुल सांकृत्यायन सांगतात, ही कादंबरी 'जगातील महान आविष्कारांपैकी एक आहे, यात शंका नाही.'

Preview

Preview
Preview

Reviews

Vijay Bhagat - 17 days ago
  • ★
  • ★
  • ★
  • ★
  • ★

भारतीय माणसाला गणपतीबद्दल प्रचंड आस्था, प्रेम आणि जिज्ञासा आहे. आपला माणूस गणपतीबद्दल आस्थेने बोलतो, गणपतीबद्दल ऐकल्यावर त्याला प्रसन्न वाटते, तो गणपतीबद्दल चौकशी करतो, गणपतीसाठी प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देतो. गणपतीबद्दल त्याच्या अबोध मनात पिढ्यांपिढ्या एक प्रकारची ओढ आहे. त्यातून गणपतीचे दैवीकरण होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही गोष्टीचे भौतिक अस्तित्व लयाला गेल्यावर त्याचे परात्मिकरण होते. परात्म झालेल्या गणपतीने आपल्या मनाची अबोध जागा व्यापलेली आहे. प्राचीन काळी भारतात अनेक ठिकाणी गणव्यवस्था होती, शासनव्यवस्था लोकशाही पद्धतीने चालत होती. गणपती हा त्या गणांचा प्रमुख असे, मुख्यस्थानी असे. गणपती हा गण परिषदेतून निवडला जात असे, गणपरिषेदेचे सदस्य कुळांच्या प्रतिनिधी मंडळातून निवडले जात असत. तसेच गणसभा कुळांचे प्रतिनिधी निवडीत असे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर शासन व्यवस्था चालत असे. निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला अभिषेक पुष्करणीत पवित्र स्नान करण्याचा सन्मान मिळत असे, हा एक प्रकारचा राज्याभिषेक होता. प्राचीन काळातील तक्षशिला आणि वैशाली गणात गणव्यवस्था होती. गणसभा आणि गणपरिषद यांच्या माध्यमातून गणपती या गणांचे संचालन करीत असे. प्राचीन काळातील या गणपतीचे वास्तव व मानवी स्वरूप 'सिंह सेनापती ' या कादंबरीमध्ये रेखाटलेले आहे. गणपतीचे मानवी रूप जाणून घेण्यासाठी त्या काळात लिहिलेली ' सिंह सेनापती ' ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी.


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.

  • ★
  • ★
  • ★
  • ★
  • ★