0 Reviews | Write Review
100 / $1.04 100.00 / $ 1.04
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 50/-
2. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
सत्यशोधक पं. सि. पाटील हे महात्मा जोतिबा फुले यांचे आद्य चरित्रकार आहेत. त्यांनी जोतिबांच्या जन्मशताब्दी निमित्त सन १९२७ मध्ये २०० पानांचे एक विस्तृत चरित्र लिहिले होते. सदर विस्तृत चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतरही सत्यशोधक पं. सि. पाटील यांनी जोतिबा फुले यांचा संबंध आलेले अनेक लोक, संस्था आणि स्थळांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणावर माहिती मिळविली. त्या माहितीच्या आधारावर एक थोरले चरित्र लिहावे असा त्यांचा मानस असला तरी कामाच्या व्यापामुळे त्यांना ते पूर्ण करता आले नाही. जोतिबांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता यावेत यासाठी त्यांनी 'महात्मा ज्योतिराव फुले यांचा अल्प परिचय' लिहून १९३८ मध्ये प्रकाशित केला. जोतिबांचे हे चरित्र आकाराने लहान असले तरी त्यांचे विचार व कार्य यांची अधिक सुस्पष्ट ओळख करून देण्यास नक्कीच उपयुक्त ठरले आहे.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.
.jpeg)









