0 Reviews | Write Review
200 / $2.76 200.00 / $ 2.76
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
या पुस्तकात मातृदेवतांविषयी प्रचलित मिथकांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नात प्राचीन इतिहास व संस्कृती, पुरातत्त्व, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान, मानसशास्त्र इ. विद्याशाखांचाही परामर्श घेतलेला आहे. त्यातून भारतातील मातृदेवतांचा खरा-खुरा परिचय वाचकांना होईल यात शंका नाही. मराठी भाषेत सलगपणे भारतातील काही मातृदेवतांची माहिती या निमित्ताने पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. या दृष्टिने या प्रयत्नाचे स्वरूप ऐतिहासिक असेच आहे.
प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या उपासना पद्धती अस्तित्वात होत्या. त्यात प्रामुख्याने मातृदेवतांचे स्थान महत्वाचे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातृदेवतांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथाही आढळतात. या कथांनाच आपण पुराकथा किंवा मिथक या नावाने संबोधतो. मिथकांची निर्मिती प्रथम व्यक्तीच्या अर्धसुप्त मनात होते. ते एक प्रकारचे त्याचे स्वप्नच असते. अशी स्वप्ने सारेच पाहू लागले की, त्याचे रुपांतर मिथकामध्ये होते. म्हणूनच मिथकांना समूहाचे स्वप्न असेही म्हणतात. अशा स्वप्नांची जुळवणी म्हणजे संस्कृतीची नवनिर्मिती असते. ही निर्मिती करताना आपल्या विरोधी गटातील संस्कृतीला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून खरी माहिती सामान्य माणसापर्यंत न जाता, ज्याचे वर्चस्व समाजावर असते; त्याच्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या मिथकांचा प्रभाव वाढविला जातो.
मातृदेवता: कंकाली, चामुंडा, वडदखीण, पद्मावती, लक्ष्मी, महालक्ष्या, तारा, सुभद्रा, याहायोगी, दुर्गा, गौरी, अंबिका, सिद्धायिका, डाकिनी, विनायकी, रेणुका, तुळजाभवानी, तुळस, रूक्मिणी, राधा, कानबाई, हिंगळा
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.