loader
Gatha Cognition®
Perception, Learning and Reasoning
माणुसकीच्या अल्याड पल्याड
Manusakichya Alyad Palyad

0 Reviews | Write Review

66
108 gms
Paperback
978-81-926776-2-0

70 / $0.95 70.00 / $ 0.95

Shipping Charges

1. Minimum shipping charges will be Rs. 30/-

2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-

3. Shipping charges for international orders at actual.

Summary of Book

विशिष्ट कालखंडात जन्मलेल्या आणि वाढलेल्या एखाद्या लेखकाने त्याला आलेल्या वास्तव जगाच्या अनुभवावर आधारित साहित्यकृती निर्माण केली तर तिच्यामध्ये खूप काही दडलेलं असतं. अंतःकरणाला भिडणाऱ्या अशा एका कथेमागे दडलेले धागेदोरे शोधून काढण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.

विसाव्या शतकात युरोपात आणि अमेरिकेत वर्णवंशभेदाच्या संदर्भात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या. ज्यू, काळे अमेरिकन अशा विशिष्ट मानवसमूहांना अतोनात अत्याचार सोसावे लागले. त्या सर्वाचा प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या रोमँ गारी या लेखकाने एका भटक्या जर्मन शेपर्ड कुत्र्याला आपल्या घरी आश्रय दिला. त्या कुत्र्याच्या सान्निध्यात आलेल्या विदारक अनुभवातून साकारलेली ही कथा खुद्द त्या लेखकाच्या जडघडणीपर्यंत आपल्याला घेऊन जाते.

त्या कथानकावर चित्रपट काढताना अमेरिकेतल्या प्रतिथयश संस्थेला कोणत्या उद्रेकाचं भय होतं ? मूळ कथानकात कोणते, कसे आणि का बदल करावे लागले ? त्यानिमित्ताने खुद्द लेखक, त्याच्या भोवतालचा समाज आणि त्या समाजातल्या घडामोडी यांचा एक विलक्षण पट आपल्यासमोर उलगडत जातो.

हा शोध घेतल्यामुळे आजच्या सामाजिक-राजकीय घडामोडीचं यथायोग्य भान आपल्याला येऊ शकतं.

Preview

Preview
Preview

Reviews


Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.